एक्स्प्लोर

T20 World Cup 2024, Rohit Sharma : हिटमॅन रोहित म्हणाला, एकदाच काय तो निर्णय घ्या, BCCI नं शून्य मिनिटात सांगितलं 'आमचं ठरलंय'!

रोहित शर्माचे कर्णधारपद चर्चेत आहे. आता भारतीय संघाला पुढील आयसीसी स्पर्धा 2024 मध्ये T20 विश्वचषकाच्या रूपाने खेळायची आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कर्णधारपदाचा प्रश्न निर्माण होत आहे.

T20 World Cup 2024 Rohit Sharma : वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही पातळ्यांवर सर्वोत्तम कामगिरी करूनही वर्ल्डकप फायनल गमावल्याने हिटमॅन कॅप्टन रोहित शर्मा ( World Cup 2023 Rohit Sharma) कमालीचा नाराज आहे. त्याला अजूनही नाराजी लपवता आलेली नाही. किंग कोहलीने थेट दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे आणि टी-20 खेळण्यास नकार दिल्यानंतर रोहितने तोच निर्णय घेतला आहे. तथापि, कसोटी संघात दोघेही असून कॅप्टन रोहित असेल. मात्र, वनडे आणि टी-20 संघात रोहित आणि विराट असेल की नाही? याची चर्चा रंगली आहे. 

त्यामध्येही रोहित शर्माचे कर्णधारपद चर्चेत आहे. आता भारतीय संघाला पुढील आयसीसी स्पर्धा 2024 मध्ये T20 विश्वचषकाच्या रूपाने खेळायची आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कर्णधारपदाचा प्रश्न निर्माण होत आहे. रोहित शर्माला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेसाठी भारताचे कर्णधारपद दिले जाईल की नाही? याची चर्चा रंगली आहे. 

टी-20 वर्ल्डकपसाठी रोहित कॅप्टन असणार!  (BCCI on Rohit) 

रोहित शर्माने शेवटचा T20 सामना T20 विश्वचषक 2022 उपांत्य फेरीत खेळला. यानंतर हार्दिक पांड्याने 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाची कमान सतत सांभाळली, जे पाहून असे वाटत होते की बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी नवीन भारतीय संघ तयार करत आहे, ज्याची कमान हार्दिक पांड्याच्या हातात असेल, परंतु आता समोर रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की 2024 टी-20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माला भारताचा कर्णधार बनवले जाईल.

रोहित टी- 20 विश्वचषकापर्यंत कर्णधारपदी कायम राहील (Sourav Ganguly on Rohit Sharma) 

टी-20 वर्ल्डकपसाठी कर्णधारपदाबद्दल बीसीसीआयने ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी रोहित शर्माची इच्छा होती. यानंतर BCCI ने रोहित T20 WC मध्ये कर्णधार असेल, असा निर्णय घेतला. दुसरीकडे, रोहित शर्मा 2024 च्या टी- 20 विश्वचषकापर्यंत कर्णधारपदी कायम राहील, अशी माझी अपेक्षा आहे आणि मी मानतो, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि रोहितला पहिल्यांदा टीम इंडियाचा कॅप्टन करणाऱ्या सौरभ गांगुली यांनी 'पीटीआय'शी बोलताना दिली आहे. 

'पीटीआय' या वृत्तसंस्थेनुसार, हार्दिक पांड्याने वर्षभर टी-20 संघाचे नेतृत्व केले असले तरी आगामी टी-20 विश्वचषकासाठी कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिली पसंती असेल. पुढे असे सांगण्यात आले की दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी बोर्ड त्याला कर्णधार बनवू इच्छित होता, परंतु हिटमॅनने मालिकेतून विश्रांती घेण्याची विनंती केली, जी बोर्डाने मान्य केली आहे. 

यापूर्वी मीडिया रिपोर्ट्सद्वारे सांगण्यात आले होते की, रोहित शर्माने निवडकर्त्यांना सांगितले होते की, जर त्याची टी-20 साठी निवड झाली नाही तर त्याला कोणतीही अडचण येणार नाही. आता 2024 च्या T20 विश्वचषकासाठी रोहित शर्माला भारताचा कर्णधार बनवलं जातं की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 05 November 2024Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Embed widget