एक्स्प्लोर
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी नवा वाद उभा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे.
या प्रकरणी मैदानातल्या पंचांकडून अहवाल घेऊन सामनाधिकाऱ्यांकडून बंदीची कारवाई अपेक्षित आहे. दरम्यान, पंचांच्या हा सगळा प्रकार लक्षात येण्याच्या अगोदरच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फफ डू प्लेसिसच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये टीव्हीवर हे पाहताच सहकारी खेळाडूंना याबाबत माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही या प्रकाराचा फोटो ट्वीट केला. डेल स्टेन सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे.WOW......Oh Mr Bancroft could be in toruble!!!!! 🤤 @MichaelVaughan @KP24 @DaleSteyn62 @ICC pic.twitter.com/R5me8bb8CD
— Junaid Javed (@JJ_JunaidJaved) March 24, 2018
हा प्रकार लक्षात येऊन आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आक्षेप घेऊनही पंचांनी नवा चेंडू मागवला नाही. या प्रकरणी बॅनक्राफ्ट दोषी आढळल्यास त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.Can we talk about this? pic.twitter.com/cmpRrOArgD
— Dale Steyn (@DaleSteyn62) March 24, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement