एक्स्प्लोर

Rashid Khan on Hardik Pandya : आयपीएलमध्ये गुजरातचं नेतृत्त्व केल्यामुळे बदललं हार्दीक पांड्याचं माइंडसेट, राशिद खानचा खुलासा

IND vs PAK : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्स संघाने यंदा आयपीएल 2022 मध्ये विजय मिळवला. ज्यानंतरच त्याला टीम इंडियाचं तिकीटही मिळालं. 

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India vs Pakistan) 5 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी हार्दिक पांड्या (Hardik Pandya)  विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीच 3 विके्टस घेत महत्त्वपूर्ण अशा 33 धावाही केल्या. दरम्यान त्याच्या या खेळीचे सर्वचजण फॅन झाले असून अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खानने (Rashid Khan) हार्दिक पांड्याच्या खेळीचं कौतुक करत आय़पीएलमध्ये गुजरात संघाचं नेतृत्त्व केल्यामुळे त्याच्या खेळीत हा फरक पडला असून त्याचा माइंडसेटही बदलला असं राशिद म्हणाला. 

राशिद खानने हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजासारखे खेळाडू संघासाठी आवश्यक असल्याचंही यावेळी नमूद केलं. तो म्हणाला, "कोणत्याही संघाला हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूंची गरज असते. असे खेळाडू संघाला चांगले योग्यवेळी सावरतात आणि त्यामुळे कर्णधाराचा भार कमी होतो. तसंच हार्दिकबद्दल बोलताना राशिद म्हणाला “हार्दिक पांड्याला जबाबदारी घ्यायला आवडतं. गुजरातचा कर्णधार झाल्यापासून त्याची मानसिकता बदलली आहे. हार्दिकला त्याची क्षमता माहीत आहे आणि तो संघाचा डाव पुढे नेऊ शकतो. मानसिकदृष्ट्या हार्दिक सामन्यातील प्रत्येक परिस्थितीत खूप मजबूत राहत असल्याचं दिसून येतं.

पांड्याचा कॉन्फिडन्सने जिंकली सर्वांची मनं

अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूत फक्त एक धाव निघाली. षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.  हार्दीक यावेळी जे काही टार्गेट आहे, ते नक्कीच करेन असं अगदी विश्वासाने न काही बोलता आपल्या रिएक्शनमधून दाखवून देत असल्यानं त्याच्या या खेळीचं आणखीच कौतुक होत आहे. 

राशिद-हार्दिक गुजरात संघात

राशिद खान आणि हार्दिक पांड्या हे दोघेही आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्स या स्पर्धेतील नव्या संघासोबत करारबद्ध झाले होते. हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि त्याने पहिल्या सत्रातच गुजरातला विजेतेपद मिळवून दिले. राशिद खाननेही स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आता आशिया कप 2022 मध्ये देखील सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान आमने-सामने येऊ शकतात.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget