KL Rahul on Virat: ''लोक काय म्हणतात याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, विराट सारखा वर्ल्ड क्लास प्लेअर तर नाहीच नाही''
Asia Cup 2022 : भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाला असून विराट कोहलीवर अनेकांच्या नजरा यंदा टिकून असणार आहेत.
Virat Kohli, Asia Cup 2022 : भारतीय क्रिकेट संघ आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला असून अनेकांच्या नजरा विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असणार आहेत. भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल यानेही माध्यमांशी नुकतच बोलताना विराटबाबातच्या प्रश्नांना अगदी हटके आणि ठासून उत्तर दिलं. विराटच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारला असता, लोक काय म्हणतात याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही,'विराट सारखा वर्ल्डक्लास प्लेअर तर नाहीच नाही,' असं वक्तव्य केएल राहुल याने केलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट करत ही माहिती दिली.
काय म्हणाला केएल?
''लोक काय म्हणतात? काय कमेंट करतात याला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. याचा आम्हा खेळाडूंवर खरच परिणाम होत नाही, विशेषत: विराटसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूवर लोक बाहेरून काय बोलतात याचा परिणाम होणार नाही. त्याला थोडा ब्रेक मिळाला आहे आणि तो त्याच्या खेळावर काम करत आहे.'' असं वक्तव्य केएल राहुल याने विराट कोहलीबाबतच्या प्रश्नाला दिलं आहे.
#AsiaCup | We don't really give much importance to comments. It doesn't really affect a player, especially a world-class player like Virat will not be affected by what people are saying on the outside. He has had a little break & he is working on his game: KL Rahul on Virat Kohli pic.twitter.com/qL8fB6esdf
— ANI (@ANI) August 26, 2022
विराट 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहलीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. विराटनं आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. पाकिस्तानविरुद्ध त्याचा 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असणार आहे. यानंतर विराट कोहलीच्या खास विक्रमाला गवसणी घालेल. भारतासाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार विराट कोहली दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. भारतासाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्मानं भारतासाठी आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार 74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.
हे देखील वाचा-