SL vs PAK, Match Highlight : पाथुम निसांकाचं नाबाद अर्धशतक, श्रीलंकेचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय
Asia Cup 2022, SL vs PAK : श्रीलंका-पाकिस्तान हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येणार असून त्यापूर्वी नुकत्याच झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं विजय मिळवला आहे.
![SL vs PAK, Match Highlight : पाथुम निसांकाचं नाबाद अर्धशतक, श्रीलंकेचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय Asia Cup 2022: Sri Lanka won match by 5 wickets against Pakistan in Match 12 at Dubai International Stadium SL vs PAK, Match Highlight : पाथुम निसांकाचं नाबाद अर्धशतक, श्रीलंकेचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/0b5a664e4cdba1e8ee6af824c68120371662743939704143_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SL vs PAK T20, Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 स्पर्धेत (Asia Cup 2022) अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. दरम्यान या दोन्ही संघामध्ये 11 सप्टेंबर रोजी अर्थात रविवारी अंतिम सामना रंगणार असून त्यापूर्वी आज सुपर 4 मधील अखेरचा सामना या दोघांमध्येच पार पडला. या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानला 5 गडी राखून मात दिली आहे. श्रीलंकेची चेस करताना सुरुवात खराब झाली असताना देखील सलामीवीर पाथुम निसांका याने टिकून राहून अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला.
श्रीलंका आणि पाकिस्ताननं दोन्ही संघानी अंतिम फेरीतील स्थान आधीच पक्क केलं होतं. त्यामुळे आजच्या या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नव्हता. दोन्ही संघांना येथे अंतिम फेरीपूर्वी आपल्या खेळाडूंची चाचपणी करण्याची संधी होती. त्यामुळे हा औपचारीक सामना एक सराव सामना होता. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळवला गेला असून श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत 19.1 षटकांत पाकिस्तानचा डाव रोखत त्यांना 121 धावांवर रोखलं.
ज्यानंतर श्रीलंकेचा संघ 122 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आला असताना त्यांची सुरुवात खराब झाली. सुरुवातीचे काही गडी स्वस्तात बाद झाले. पण सलामीवीर पाथुम निसांका याने टिकून राहून अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला. त्याने 48 चेंडूत 5 चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद 55 धावा केल्या. त्याला दासून, वानिंदू, भानुका यांनीही साथ दिली त्यामुळे श्रीलंकेनं 17 षटकात केवळ 5 गडी गमावत आव्हान पार केलं. आता श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकला असून पाकिस्ताननं संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे, त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होणार हे नक्की!
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)