एक्स्प्लोर
अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन अनिल कुंबळे पायउतार झाले आहेत. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त एनएनआयने दिले आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांचा आज शेवटचा दिवस होता. प्रशिक्षकपदाचा करार सुरु ठेवण्यास अनिल कुंबळे यांनी असहमती दर्शवली आहे. 23 जून 2016 रोजी टीम इंडियाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
अनिल कुंबळेंची कारकीर्द
कसोटी – 132 विकेट्स – 619- कसोटीत सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुरलीधरन आणि वॉर्ननंतर कुंबळे तिसऱ्या स्थानावर
- 1999 साली पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटीच्या एकाच डावात दहा विकेट्स काढण्याची कामगिरी
- 1996 ते 2003 या कालावधीत चार वन डे विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व
- 2007 ते 2009 या कालावधीत भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्त्व. 14 कसोटींत 3 विजय, 5 पराभव
- 2012-2013 या कालावधीत रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा आणि 2013-2015 या कालावधीत मुंबई इंडियन्सचा चीफ मेन्टॉर
- 2010 कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद
- 2012 आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपद
आणखी वाचा























