एक्स्प्लोर
भारतीय महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी
डर्बी : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली आहे. इंग्लंडवर 35 धावांनी मात करुन कर्णधार मिताली राजच्या टीम इंडियाने दणदणीत विजय साजरा केला.
भारताने इंग्लंड महिला संघाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाज 246 धावांमध्येच गारद झाल्या.
दिप्ती शर्मा 3, शिखा पांडे 2 आणि पूनम यादवने घेतलेल्या एका विकेटच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना स्वस्तात रोखता आलं. इंग्लंडचा अख्खा संघ केवळ 246 धावांचीच मजल मारु शकला.
त्याआधी भारतीय महिला फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. सलामीवीर पुनम राऊत (86) आणि स्मृती मंधाना (90) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार मिताली राजनेही 71 धावांची खेळी करुन महत्वाची भूमिका निभावली. तर हरमनप्रीत कौरने नाबाद 24 धावा केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement