एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
17 वर्षानंतर इंग्लडने जिकंली श्रीलंकेत मालिका
मोईन अली आणि जॅक लीचच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात 57 धावांनी पराभूत केलं. या विजयासह इंग्लंडने 17 वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका जिकंली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
कोलंबो : मोईन अली आणि जॅक लीचच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात 57 धावांनी पराभूत केलं. या विजयासह इंग्लंडने 17 वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका जिकंली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिकूंन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात 290 धावा केल्या, ज्यात सॅम कुरानने 64 आणि जोस बटलरने सर्वाधिक 63 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलरुवान परेराने 4 बळी घेतले तर मलिंदा पुष्पकुमारने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले.
रोशन सिल्वा 85, दिमुथ करुणारत्ने 63, आणि धनंजय डी सिल्वा 53 यांच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या डावात 336 धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशिद आणि जॅकने प्रत्येकी 3 तर मोईन अलीने 2 गडी बाद केले.
दुसऱ्या डावात इंग्लंडने 346 धावा करुन श्रीलंकेला 301 धावांचा लक्ष्य दिलं. ज्यात कर्णधार जो रुटच्या 124 धावांच्या खेळीचा समावेश होता. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 243 धावात बाद झाला, आणि इंग्लंडने 58 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडकडून जॅक लीच याने सर्वाधिक 5 गडी तर मोईन अलीने 4 गडी बाद केले.
दोन्ही संघात कोलंबोमध्ये 23 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement