विलेपार्लेतील एस.व्ही. रोड परिसरात देखील पाणी साचले आहे.
3/7
गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे.
4/7
सायन, किंग सर्कल भागातही पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
5/7
पहाटे पासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस पडतो आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली , घाटकोपर, भांडुप मुलुंड, चेंबूर कुर्ला, सायन, दादर सह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
6/7
मुंबईसह उपनगरात कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्याचाच फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसत आहे.
7/7
संततधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचलं आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.