या सामन्यात के एल राहुलने 47 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या खेळीने राहुलने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडत, टॉपवर पोहोचला.
2/7
रहाणेनंतर सिक्सर किंग युवराज सिंहचा नंबर लागतो. युवराजने इंग्लंडविरुद्ध सलग सहा षटकार ठोकत 58 धावा ठोकल्या होत्या.
3/7
राहुल आणि सेहवागनंतर या यादीत कर्णधार विराट कोहलीचा नंबर लागतो. कोहलीने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध 66 धावा केल्या होत्या.
4/7
टी 20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम सेहवागच्या नावावर होता. सेहवागने 2007 च्या टी ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध 68 धावा केल्या होत्या. सेहवागच्या या धावांचा विक्रम मोडत राहुलने 71 धावा केल्या.
5/7
युवराजशिवाय गौतम गंभीरनेही 2007 च्या टी ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये 58 धावा केल्या होत्या.
6/7
के एल राहुलचं झटपट अर्धशतक, बुमराह आणि आशिष नेहरा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात इंग्लंडवर 5 धावांनी सनसनाटी विजय मिळवला.
7/7
या यादीत अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर आहे. रहाणेने 2011 मध्ये मँचेस्टरच्या मैदनावर 61 धावा ठोकल्या होत्या.