पालघरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुजरातकडून मुंबईकडे जाणारे दुधाचे टँकर दापचरी इथे अडवले असून खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी उपस्थित होते.
2/7
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि इतर शहरांचा दूध पुरवठा रोखून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हा स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा मुख्य हेतू होता. मात्र स्वाभिमानीच्या आंदोलनाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. कारण मुंबईचा दूध पुरवठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही सुरळीत सुरु आहे.
3/7
4/7
फोडलेल्या टँकरमधुन दूध घरी नेण्यासाठी गावातल्या लोकांनी एकच गर्दी केली.
5/7
जालन्याच्या पासोडी शिंदी गावात दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यांवर सांडण्यात आलं. जाफराबादवरुन बुलडाण्याच्या दिशेने दुधाच्या गाड्या जात होत्या. तर सांगलीतल्या कडेगावमधल्या आसदमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा अभिषेक घालून निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर दूध उत्पादकांनी एकत्र येऊन रस्त्यावर दूध ओतून दिलं.
6/7
राज्यात दुसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाच्या गाड्या रोखणं सुरु ठेवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाली गावात दुधाचा टँकर फोडण्यात आला. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टँकरमधून पाणी सोडलं जातं, त्याप्रमाणे इथल्या टँकरमधून दूध सोडलं गेलं.
7/7
दूध बंद आंदोलनाचा आता पुण्यात परिणाम होताना दिसत आहे. पुण्यात दुपारपर्यंत दूध साठा संपण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून चितळेंचे दूध संकलन बंद आहे. त्यामुळे पुण्यात उद्यापासून चितळेंचे दूध मिळणार नाही. शिवाय पुण्याकडे येणारी दूधाची वाहने ठिकठिकाणी अडवली जात आहेत. त्यामुळे आज संध्याकाळनंतर पुण्यात दूध मिळेल का, याबाबत अस्पष्टता आहे.