या फोनमध्ये 4 GB आणि 6 GB रॅमचे पर्याय असणार आहेत. शिवाय 64 GB चं इंटर्नल स्टोअरेज असून 3000 mAh क्षमतेची बॅटरी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असणार आहे.
2/6
वनप्लस 3 मध्ये 5.5 इंचची AMOLED डिस्प्ले असणार आहे. ज्याचं रिझॉल्युशन 1080 पिक्सेल असेल. सोबतच हा फोन NFC सपोर्टीव्ह असून यामध्ये 820 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिलं आहे.
3/6
या स्मार्टफोनची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्व नोंदणी करण्याची गरज नाही. वनप्लसचे सह निर्माता कार्ल पेई यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
4/6
हा VR हेडसेट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अगोदर नोंदणी करणं गरजेचं आहे. विशेष म्हणेज हे सेल फक्त अमेझॉन इंडियाच्या अॅपवरच उपलब्ध असणार आहे.
5/6
वनप्लस कंपनी आपला आगामी वनप्लस 3 हा फ्लॅगशीप स्मार्टफोन 15 जूनला लाँच करत आहे. त्याआधीच कंपनीने VR हेडसेटची सेल ठेवली आहे.
6/6
अमेझॉन इंडियावर 7 जूनला वनप्लस 3 या स्मार्टफोनचा VR हेडसेट केवळ 1 रुपयात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे . यापूर्वी 3 जूनला ही सेल झाली होती. त्यामुळे VR हेडसेट 1 रुपयात खरेदी करण्याची ही संधी दुसऱ्यांदा असणार आहे.