कारगील युद्धापासून ते कालच्या सर्जिकल स्ट्राईकपर्यंत निंभोरकर यांनी शत्रूसोबत झुंज दिली. आणि उरी बसलेल्या घावांचा बदला घेतलाय. महाराष्ट्रातील जिगबाज पराक्रमी पुत्राच्या दैदीप्यमान कर्तृत्वाला एबीपी माझाचा सलाम
2/6
पाकिस्तानशी दोन हात करताना ते जखमी झाले. पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा नव्या जोमानं शत्रूशी दोन हात करायला सिद्ध झाले.
3/6
विशेष म्हणजे अनेक शौर्य पदकांनी सन्मानित झालेले राजेंद्र निंभोरकर कारगिल युद्धामध्येही सहभागी झाले.
4/6
लष्कराच्या कारवाईच्या नियोजनापासून ते ती पूर्ण करेपर्यंत प्रत्येक टप्यावर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हालाचलीवर त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे भारताची मोहीम फत्ते झाली.
5/6
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात एका मराठमोळ्या शिलेदाराचा सिंहाचा वाटा आहे. आणि तो बाहद्दूर वीर म्हणजे लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोलकर यांचा.
6/6
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या कारवाईमध्ये लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर महत्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांची भेट घेऊन त्याबद्दल अभिनंदनही केलं.