महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांनी स्वतःहून प्लास्टिक बंदीचा पण केला पाहिजे.
2/6
मुंबईला प्लॅस्टिकमुक्त करायचं असेल तर फक्त नियम करून चालणार नाहीत. तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील होणं गरजेचं आहे.
3/6
29 ऑगस्टला प्रत्यक्षात मुंबई तुंबवली ती, मुंबईकरांनीच पोसलेल्या प्लॅस्टिकच्या भस्मासूरानं. 30 ऑगस्टला मुंबई महापालिकेनं अनेक टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आहे.
4/6
मुंबई महापालिकेच्या हद्दीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर आधीपासूनच बंदी आहे. मात्र, ही बंदी फक्त कागदोपत्री असल्याचं उघड झालं आहे.
5/6
मुंबईतून प्लास्टीक हद्दपार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे आणि त्याची सुरुवात महापालिकेच्या भाजी मंडईपासून केली जाणार आहे.
6/6
29 ऑगस्टला मुंबईत तुंबलेल्या पाण्याला प्लास्टिक पिशव्या जबाबदार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुंबई महापालिकेला आता जाग आली आहे.