मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी धुरा कर्णधार रोहित शर्माला सांभाळावी लागेल. यंदाच्या मोसमात त्याने खास कामगिरी केलेली नसली, तरी अंतिम सामन्यातील त्याची कामगिरी महत्वपूर्ण ठरणार आहे. या आयपीएल मोसमात रोहित शर्माने 16 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
2/8
स्फोटक फलंजाज कायरन पोलार्डला यावेळी त्याची नैसर्गिक खेळी करावी लागणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने काही सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. यावर्षी 16 सामन्यात त्याच्या नावावर 378 धावा आहेत.
3/8
मुंबईचा सलामीवीर फलंदाज पार्थिव पटेलमध्ये मॅच विनिंग खेळी करण्याची क्षमता आहे. चांगली सुरुवात करुन दिल्यास मुंबईला त्याचा मोठा फायदा होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये पार्थिव पटेलने 15 सामन्यात 391 धावा केल्या आहेत. एका आयपीएल मोसमातील या त्याच्या सर्वाधिक धावा आहेत.
4/8
अंतिम सामन्यात पंड्या बंधूंवरही नजर असेल. अखेरच्या षटकात यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याने महत्वपूर्ण खेळी केली आहे. तर कृणल पंड्यानेही यंदाच्या आयपीएल मोसमात अष्टपैलू कामगिरी केली आहे.
5/8
मुंबई इंडियन्सला लसिथ मलिंगाकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. मलिंगाने 11 सामन्यांमध्ये 11 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.
6/8
मुंबईसाठी कर्ण शर्मा महत्वपूर्ण खेळाडू ठरु शकतो. त्याने यंदाच्या आयपीएल मोसमात 8 सामन्यांमध्ये 13 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.
7/8
मुंबईच्या गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमरावर असेल. बुमराने यंदाच्या आयपीएल मोसमात 15 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत.
8/8
मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी पुन्हा महाराष्ट्र डर्बी पाहायला मिळणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरच्या या लढाईत स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होईल.