एक्स्प्लोर
Kerala Flood: शाहरुख, जॅकलिन, प्रभास, कमल हसन, केरळला कोणाची किती मदत?

1/10

तेलुगू स्टार विजयने 5 लाखांची मदत दिली आहे. शिवाय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने 1 लाख रुपये दिले. (फोटो इंस्टाग्राम)
2/10

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने आपली एनजीओ ‘मीर फाऊंडेशन’द्वारे केरळला 21 लाख रुपयांची मदत केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
3/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही केरळला 15 लाखांची मदत केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
4/10

केरळातील पूरपरिस्थितीला केंद्र सरकारनं तीव्र नैसर्गिक संकट जाहीर केलं आहे. पुराची तीव्रता आणि कोसळलेल्या दरडी यामुळं गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला. केरळमध्ये महापुराने थैमान घातलं. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी आतापर्यंत जवळपास चारशे जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत.
5/10

दक्षिणेचे सुपरस्टार आणि राजकीय नेते कमल हसन यांनी 25 लाखांची मदत दिली. तर अभिनेता सूर्यानेही 25 लाख रुपयांचं योगदान दिलं. (फोटो इंस्टाग्राम)
6/10

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणारी एनजीओ ‘हॅबिटेट फॉर ह्यूमॅनिटी इंडिया’ला 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केरळच्या महापुराने झालेली परिस्थिती खूपच दु:खद आहे, असं जॅकलिनने म्हटलं आहे. (फोटो इंस्टाग्राम)
7/10

तमिळ अभिनेता धनुषने केरळला मदतीचा हात दिला आहे. त्याने 15 लाख रुपये सहाय्यता निधीला दिले. तर अभिनेता विशाल आणि शिवकार्तिकेयन यांनीही 10-10 लाख रुपये दिले. (फोटो इंस्टाग्राम)
8/10

दरम्यान केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सिनेसृष्टीनेही केरळला मदतीचा हात दिला आहे. हिंदी असो किंवा दक्षिणेकडील सिनेसृष्टी असो, कलाकार मंडळी मदतीसाठी पुढे आले आहेत.
9/10

‘बाहुबली’ फेम सुपरस्टार प्रभासने केरळ रिलीफ फंडमध्ये 25 लाख रुपये दिले. (फोटो इंस्टाग्राम)
10/10

अल्लू अर्जुनने केरळ रिलीफ फंडसाठी 25 लाख रुपये दिले. शिवाय लोकांनीही मदतीचा हात द्यावा, असं आवाहन केलं. (फोटो इंस्टाग्राम)
Published at : 21 Aug 2018 08:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
