एक्स्प्लोर
कोहलीमुळेच मोठी इनिंग खेळू शकलो : केदार जाधव
1/7

या सामन्यासाठी केदार जाधवचे आई-वडिल, पत्नी आणि मुलगीही आली होती. त्यांच्यासमोर केदार जाधवने शतक ठोकून त्यांना अनोखी मानवंदना दिली.
2/7

यावेळी केदार जाधव म्हणाला, "माझ्या घरच्या मैदानात, कुटुंबासमोर मी एक उत्तम खेळी करुन मी देशासाठी सामना जिंकला याचा मला अभिमान आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या संघाला जिंकवता, देशाचा अभिमान वाढवता, तेव्हा ती खूपच मोठी बाब असते".
3/7

दुसरीकडे विराटसोबत धावणं हे मोठं आव्हन असल्याची कबुली केदारने दिली.
4/7

"मोठं लक्ष्य कसं पूर्ण करायचं, हे कर्णधार कोहलीने यापूर्वी अनेकवेळा दाखवलं आहे. त्यामुळेच मला इंग्लंविरुद्धची खेळी करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. यापूर्वी मी अनेक फलंदाजीच्या संधी गमावल्या होत्या. त्यातच विराटसोबतही फलंदाजी करणं आणि त्याची फलंदाजी जवळून पाहण्याची संधीही चुकली होती. पण या सामन्यानिमित्त ती संधी मिळाली, त्यामुळे हा माझ्यासाठी खास दिवस होता", असं केदार जाधवने नमूद केलं.
5/7

त्यानंतर केदार जाधवनेही आपल्या खेळीचं राज उघडून सांगितलं. याशिवाय केदार जाधवने कर्णधार कोहलीचेही आभार मानले.
6/7

कर्णधार विराट कोहलीमुळेच मी इतकी चांगली खेळी करु शकलो, असं टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार केदार जाधवने सांगितलं.
7/7

इंग्लंडचं डोंगराएवढं 351 धावांचं लक्ष्य लिलया पेलल्यानंतर, टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने, मराठमोळ्या केदार जाधवचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. केदार जाधवने 76 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकार ठोकत 120 धावा केल्या.
Published at : 16 Jan 2017 11:30 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























