एक्स्प्लोर
'उडता पंजाब'वर कोर्टाच्या या आहेत सूचना!
1/5

चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे, सेन्सॉर बोर्डाने फक्त प्रमाणपत्र देण्याचं काम करावं, अशा शब्दात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कार्टाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं होतं. सिनेमाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. उडता पंजाब हा चित्रपट 17 जूनला प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर, आलिया भट, करिना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
2/5

‘सृजनात्मक स्वातंत्र्यावर अनावश्यक निर्बंध लादता कामा नयेत. कोणत्याही दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटातील आशयावर आदेश देऊ शकता येत नाहीत. एखादा सीन कापण्यास किंवा हटवण्यास किंवा बदलण्यास सुचवण्याचे सीबीएफसीचे अधिकार संविधानाला धरुन असावेत.’ असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
Published at : 13 Jun 2016 07:13 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा























