हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा बसेरा असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती'असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात.
2/8
कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव आपण भान हरपून पाहातच राहतो.
3/8
शिखर स्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे,पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, तसंच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत.
4/8
दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा- घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते.
5/8
झाडांच्या खोडांवर,फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर अनेक झाडांभोवती पिंगा घालत असतात.
6/8
विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय असते. एक ताल असतो.
7/8
काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करत जीवनगाणे गात असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखावून जाते.