वाघ बकरी - हा सुद्धा मध्ययुगीन काळापासून खेळला जातो. 4 वाघ आणि 18 बकऱ्या यामध्ये असतात...बुद्धिबळासारखा हा खेळ चाल खेळून खेळला जातो. हा खेळ दोघातच खेळला जातो. यामध्ये एक खेळाडू वाघ होतो तर दुसरा खेळाडू बकरी होतो...
2/9
सांप सीडी- 8 व्या शतकापासून खेळला जायचा. जो आजही अनेक जण खेळतात
3/9
पालांगगुडी - हा खेळ चिंचोके च्या मदतीने खेळला जातो. हा चिंचोके गोळा करून दोन जण मिळून खेळला जातो. हा खेळ कोडं सोडविल्याप्रमाणे आहे. ज्याच्याकडे जास्त चिंचोके राहतील तो खेळाडू खेळ जिंकतो
4/9
मीकाडू - हा खेळ सुद्धा काचापाणी सारखाच खेळला जातो. हा जपानी खेळ आहे , एकमेकांवर असलेल्या लाकडी काड्या बाजूला करताना दुसऱ्या काडीला धक्का लागू नये याची खबरदारी हा खेळ खेळताना घ्यावी लागते
5/9
इंडिया स्टडी सेंटर आणि बहिशाल शिक्षण विभाग यांच्या वतीने प्राचीन खेळांचं प्रदर्शन मुंबई विद्यापीठात भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात 14 प्राचीन खेळ पाहायला मिळत आहेत. ते खेळ आपण खेळूही शकतो आणि समजूनही घेऊ शकतो. यामध्ये महाभारतापासून, मध्ययुगीन काळात खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश आहे.
6/9
काचपाणी- हा खेळ अगदी प्राचीन काळापासून खेळला जातो. यामध्ये काचपाणी हा खेळ महाराष्ट्राचा प्राचीन खेळ आहे ज्यामध्ये बांगडीच्या तुकड्याचा वापर करून एकमेकांवर ठेवले जातात आणि हे खेळ खेळताना बांगडीच्या तुकडे एक एक बाजूला केले जातात. मात्र हे करत असताना दुसरा बांगडीचा तुकड्याला धक्का ना लगता हा खेळ खेळायचा असतो.
7/9
चेकर्स - हा खेळ सुद्धा दोन जण मिळून बुद्धिबळासारखा खेळला जातो. यात कॉइनचे दोन सेट च्या साह्याने या खेळ खेळला जातो.
8/9
चौपार- हा खेळ महाभारतापासून खेळला जायचा. जास्तीत जास्त 4 जण मिळून हा खेळ खेळतात. हा खेळ दुर्योधन आणि युधिष्ठीरमध्ये खेळला गेला होता. यामध्ये शकुनीने यात वापरल्या जाणाऱ्या फाशावर जादू केली होती, असं सांगितलं जातं. पांडव द्रौपदीला दावावर लावून याच खेळात हरले होते.
9/9
अष्ट चम्मा- दहाव्या शतकात ह्या प्रकारचा खेळ खेळला जायचा. ह्या गेमला नवरा नवरी खेळ सुद्धा सबोधलं जात. फासा आणि सोंगटीच्या सहाय्याने हा खेळ खेळला जातो.