PM Modi : पंतप्रधान मोदींची संसदीय पक्ष अध्यक्षपदी होणार निवड Results 2024
सत्तास्थापनेआधी नवी दिल्लीत जोरबैठकांना वेग आलाय. एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहे. लोेकसभा निकालांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलीय.
दरम्यान आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
एनडीएची आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत पंतप्रधान मोदींची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल. त्यानंतर मोदी आपला तिसऱ्या टर्मचा रोडमॅप मांडणार आहेत. नरेंद्र मोदींसह एनडीएचे सर्व नेता आज राष्ट्रपती भवनात संध्याकाळी ५ वाजता सत्तास्थापनेचा दावा करतील. बैठकीला अजित पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहतील.