असूस जेनफोन 3 डिलक्स (जेडएस 570 केएल) - 6 जीबी रॅम हे मुख्य आकर्षण असलेला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 62 हजार 999 रुपयांना लॉन्च झाला होता. मात्र, ग्राहकांसाठी अद्याप हा स्मार्टफोन उपलब्ध झाला नाही.
2/6
शाओमी नोट 2 - जवळपास 34 हजार रुपये किंमतीच्या या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आहे. हा स्मार्टफोन ड्युअल कव्हर्ड स्क्रीनसोबत आहे. सध्या चीनमधील बाजारपेठेत हा स्मार्टफोन उपलब्ध असून, लवकरच भारतीय यूझर्ससाठीही उपलब्ध केला जाणार आहे.
3/6
आपला स्मार्टफोन अधिकाधिक वेगवान असावा, असे प्रत्येक स्मार्टफोन यूझरला वाटत असते. त्यासाठी दोन किंवा तीन जीबी रॅमचे स्मार्टफोन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसतो. मात्र, आता मोबाईल बाजारात 6 जीबी रॅमचे स्मार्टफोनही दाखल झाले आहेत. आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनबाबत माहिती देणार आहोत :
4/6
वनप्लस 3 - या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम असून, याची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. शिवाय, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आला आहे.
5/6
शाओमी मी 5 एस प्लस - गेल्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झाला. 128 जीबी व्हेरिएंटच्या या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनची किंमत सुमारे 26 हजार रुपये आहे.
6/6
लेईको ले मॅक्स 2 - 6 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन भारतात 29 हजार 999 रुपयांना लॉन्च केला आहे.