एक्स्प्लोर
Yerba Mate : मेस्सीच्या एनर्जीचं रहस्य, 'ही' ड्रिंक आहे अर्जेंटिंना संघाचं सीक्रेट?
Yerba Mate : अर्जेंटिना संघाच्या या स्पेशल ड्रिंकचे नाव येरबा माटे (Yerba Mate Drink) असं आहे. हे एक पेय हर्बल आहे. ही ड्रिंक अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे.
Yerba Mate Secret of Lionel Messi and Argentina Team Energy
1/10

FIFA World Cup 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत (FIFA WC 2022) अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. या सामन्यामध्ये अर्जेंटिना संघाचा कर्णधार आणि स्टार फूटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ खूप उत्साहात खेळताना पाहायला मिळाला.
2/10

सामन्याच्या सुरुवातीपासून अर्जेंटिना संघ फ्रान्सच्या संघावर वरचढ ठरताना दिसला. सेकेंड हाफमध्ये फ्रान्सच्या एम्बाप्पेने सामना पूर्णपणे बदलला. मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवला.
3/10

फिफामध्ये अर्जेंटिना संघातील खेळांडूचा उत्साह आणि एनर्जीमागे एक महत्त्वाचं कारण समोर आल्याचं म्हटलं जात आहे. एक स्पेशल ड्रिंक अर्जेंटिना संघाच्या विजयाचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
4/10

हे स्पेशल ड्रिंक कोणतं आहे आणि याचा अर्जेंटिनाच्या यशामागे याचा संबंध काय, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
5/10

हे ड्रिंक लिओनेल मेस्सी याच्यासह अर्जेंटिना संघातील खेळाडूंचं आवडतं पेय आहे. ही ड्रिंक अर्जेंटिनाच्या संघासाठी अतिशय खास आहे.
6/10

या ड्रिंकचा 5 क्विंटलचा साठा घेऊन अर्जेंटीना संघ फिफासाठी कतारमध्ये पोहोचला. येथे दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की मेस्सीच्या हातामध्ये एक ड्रिंक आहे. ही ड्रिंक खूप खास आहे.
7/10

या खास ड्रिंकचं (Drink) नाव येरबा माटे असं आहे. येरबा माटे (Yerba Mate) एक हर्बल ड्रिंक (Harbal Drink) आहे. हे ड्रिंक अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे.
8/10

हे पेय यरबा माटे नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतं. यरबा माटे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे.
9/10

येरबा माटे (Yerba Mate Drink) एक प्रकारचा चहा आहे. याला एक खास प्रकारचा काढाही म्हणता येईल.
10/10

लौकी नावाच्या पारंपारिक भांड्यामध्ये हे येरबा माटे ड्रिंक पिण्याची पद्धत आहे. यामध्ये एक स्ट्रॉ असते. यरबा माटे नावाच्या वनस्पतीची पाने पाण्यामध्ये उकळवून हे पेय तयार केलं जातं. लौकी नावाच्या भांड्यामध्ये हे ड्रिंक उकळवतात, त्यामध्ये एक जाळीदार स्ट्रॉ असते. त्यामुळे स्ट्रॉमधून पानं गाळून तुम्हाला हे ड्रिंक प्यायला मिळतं.
Published at : 20 Dec 2022 11:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























