एक्स्प्लोर
In Pics : सूर्या-विराटसंह रोहितची फटकेबाजी, मग बोलर्सची कमाल गोलंदाजी, भारताचा नेदरलँडवर 56 धावांनी विजय
IND vs NED : टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला मात दिल्यानंतर आता भारतीय संघानं नेदरलँडवर विजय मिळवला आहे.
IND vs NED
1/10

टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवत पाकिस्तान पाठोपाठ आता नेदरलँडवर दमदार असा विजय मिळवला आहे.
2/10

भारतानं आधी दमदार फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजी करत 56 धावांनी नेदरलँडला मात दिली.
3/10

यावेळी आधी फलंदाजी करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतक झळकावली.
4/10

यामध्ये रोहितने 53, सूर्यकुमारने नाबाद 51आणि विराटने नाबाद 62 धावा करत मोलाचं योगदान दिलं.
5/10

त्यानंतर 180 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या नेदरलँडची सुरुवातच खास झाली नाही.
6/10

भारतीय गोलंदाजांनी नेदरलँडच्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, तसंच विकेट घेणंही कायम ठेवलं.
7/10

20 षटकात 123 धावांवर नेदरलँडला भारतानं रोखलं. ज्यामुळे भारत 56 धावांनी सामना जिंकला.
8/10

यावेळी भारताकडून आर आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमार या चारही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
9/10

विशेष म्हणजे या विजयासह भारताच्या नावावर 4 गुण झाले असून नेट रनरेटही भारताचा +1.425 झाला आहे. म्हणून ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी आहे.
10/10

25 चेंडूत नाबाद 62 धावा ठोकणाऱ्या मुंबईकर सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून सन्मानित केलं.
Published at : 27 Oct 2022 06:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion





















