एक्स्प्लोर
In Pics : आधी दमदार बॅटिंग, मग कडक फिल्डिंग, भारताचा बांगलादेशवर 5 धावांनी विजय
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला आहे.
IND vs BAN
1/10

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारतानं 5 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे.
2/10

दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ, मग पावसाचा व्यत्यय, ओव्हर्ससह टार्गेटमध्ये बदल झाल्यानंतर अखेर भारतानं 5 धावांनी सामना जिंकला आहे.
3/10

अगदी रोलरकोस्टर राईडप्रमाणे झालेला सामना अखेर भारताच्या बाजूने झुकला. आधी फलंदाजी करत भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
4/10

ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. सलामीवीर लिटन दासनं एकहाती सामना बांगलादेशला जिंकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण केएलनं केलेनं 8 व्या षटकांत केलेल्या एका थरारक थ्रोनं दासला धावचीत केलं आणि तिथून सामना फिरला.
5/10

पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळं 16 षटकात बांगलादेश 145 धावाच करु शकला आणि ज्यामुळं भारतानं 5 धावांनी जिंकला.
6/10

सामन्यात भारताचा युवा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अर्शदीपनं उल्लेखणीय कामगिरी करत एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्याच पण डेथ ओव्हर्समध्येही चांगली गोलंदाजी केली.
7/10

विशेष म्हणजे भारताचा सलामवीर केएल राहुल आजच्या सामन्यातून पुन्हा एकदा फॉर्मात परतला. त्यानं 50 धावा करत दमदार अर्धशतक झळकावलं.
8/10

विराटनं आजही भारताची फलंदाजी सावरत नाबाद 64 धावा केल्या.
9/10

सामनावीर म्हणून भारताकडून नाबाद 64 धावा करणाऱ्या विराट कोहलीला गौरवण्यात आलं.
10/10

भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवत ग्रुप 2 मध्ये अव्वलस्थान मिळवलं आहे.
Published at : 02 Nov 2022 10:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























