एक्स्प्लोर
In Pics | भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सन्मान
Tokyo Paralympics tokyo 2020
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भारताच्या पॅरालिम्पिक खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचा सन्मान केला. या दरम्यान, खेळाडूंनी त्यांना आपल्या स्वाक्षरीसह एक स्टोल भेट केली, जी मोदींनी त्यांच्या गळ्यात घातली होती. भारतीय पॅरा-अॅथलीट पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह 19 पदके जिंकून टोकियोहून परतले आहेत. ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. पदकतालिकेत भारत 24 व्या स्थानावर आहे.
2/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅडमिंटन खेळाडू रौप्य पदक विजेते नोएडा जिल्हाधिकारी सुहास यथिराज, सुवर्णपदक विजेता कृष्णा नागर आणि युवा पलक कोहली यांच्याशी बातचित करताना दिसले. पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच समाविष्ट झालेल्या बॅडमिंटनमध्ये भारतीयांनी दोन सुवर्णांसह चार पदके जिंकली. अवनी लेखरा आणि सिंहराज अडाना हे नेमबाजही पंतप्रधानांशी बोलताना दिसले. दोघांनी दोन दोन पदके जिंकली आहेत.
Published at : 09 Sep 2021 09:29 PM (IST)
आणखी पाहा























