एक्स्प्लोर
IPL 2023: मुंबईचा तिलक, चेन्नईचा तुषार, अन् राजस्थानचा यशस्वी... या 5 जणांनी यंदाची स्पर्धा गाजवली
IPL 2023: आयपीएलच्या 16 पर्वात आतापर्यंत पाच अनकॅप्ड खेळाडूंनी यंदाच्या पर्वात दमदार कामगिरी केली आहे. आपल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये प्रेवश मिळण्याचा मार्ग देखील खुला केला आहे.
![IPL 2023: आयपीएलच्या 16 पर्वात आतापर्यंत पाच अनकॅप्ड खेळाडूंनी यंदाच्या पर्वात दमदार कामगिरी केली आहे. आपल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये प्रेवश मिळण्याचा मार्ग देखील खुला केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/718aacc86f67480d1ff0ae24e25983891683882662034720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL 2023
1/10
![1. जितेश शर्मा - पंजाब किंग्जकडून खेळणारा फलंदाज जितेश शर्माने आतापर्यंत आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांना भारावून टाकले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/b381e796c07ee827303af5e43e75ac64899b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1. जितेश शर्मा - पंजाब किंग्जकडून खेळणारा फलंदाज जितेश शर्माने आतापर्यंत आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांना भारावून टाकले आहे.
2/10
![आतापर्यंत 11 सामन्यांच्या 11 डावांमध्ये त्याने 160.49 च्या स्ट्राइक रेटने 260 धावा केल्या आहेत. जितेशने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/87716c960dc19164b94badd7de0546041dac5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत 11 सामन्यांच्या 11 डावांमध्ये त्याने 160.49 च्या स्ट्राइक रेटने 260 धावा केल्या आहेत. जितेशने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केले होते.
3/10
![2. तिलक वर्मा - मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या तिलक वर्माने आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. तिलकने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/9754e9f19a440286f03c9c8a52c56cc3267af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2. तिलक वर्मा - मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या तिलक वर्माने आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. तिलकने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत.
4/10
![ज्यात त्यांनी फलंदाजी करताना 158.38 च्या स्ट्राइक रेटने 274 धावा केल्या आहेत. या पर्वात त्याचा सर्वात जास्त स्कोर 84 धावांचा आहे. तिलक याने मागील हंगामात पदार्पण केले आणि पहिल्याच हंगामात त्याने 397 धावा करून सर्वांची मनं जिंकली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/e8e2f67632efd927a3693c6730bb7672a2edd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यात त्यांनी फलंदाजी करताना 158.38 च्या स्ट्राइक रेटने 274 धावा केल्या आहेत. या पर्वात त्याचा सर्वात जास्त स्कोर 84 धावांचा आहे. तिलक याने मागील हंगामात पदार्पण केले आणि पहिल्याच हंगामात त्याने 397 धावा करून सर्वांची मनं जिंकली आहेत.
5/10
![3. यशस्वी जयस्वाल - आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत दोन शतके झळकावण्यात आली आहेत. ज्यामध्ये दुसरे शतक राजस्थान रॉयल्सची सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या नावाने आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/ac71e9f9c15d07a13f519a78f0003a12f09c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3. यशस्वी जयस्वाल - आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत दोन शतके झळकावण्यात आली आहेत. ज्यामध्ये दुसरे शतक राजस्थान रॉयल्सची सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या नावाने आहे.
6/10
![जयस्वालने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 160.61 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या आहेत. जयस्वालने या पर्वात 62 चौकार आणि 21 षट्कार मारले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/433af8fd4926a79a5d7298e87b33fbe20833a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जयस्वालने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 160.61 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या आहेत. जयस्वालने या पर्वात 62 चौकार आणि 21 षट्कार मारले आहेत.
7/10
![4. तुषार देशपांडे - चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने आतापर्यंतच्या आपल्या कामगिरीने सर्वांना भुरळ घातली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/064fe31876187c23ec77480e61daa07122a66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4. तुषार देशपांडे - चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने आतापर्यंतच्या आपल्या कामगिरीने सर्वांना भुरळ घातली आहे.
8/10
![तुषार सध्या 19 विकेट्ससह स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये त्याने 21.79 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/9c389261a12ee39a93649000d2092191730bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुषार सध्या 19 विकेट्ससह स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये त्याने 21.79 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या आहेत.
9/10
![5. सुयश शर्मा - कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा स्टार स्पिनर गोलंदाज सुयश शर्मा त्याचा पहिला आयपीएलचे पर्व खेळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/4e7ff319ead0835e0d236b548d6513ba337ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5. सुयश शर्मा - कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा स्टार स्पिनर गोलंदाज सुयश शर्मा त्याचा पहिला आयपीएलचे पर्व खेळत आहे.
10/10
![त्याने त्याच्या पहिल्याच पर्वात सर्वांना सुखद अनुभव दिले आहेत. सुयशने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये 25.80च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/dddf4bce9757f68bdb9c25251528e8b4fa83a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याने त्याच्या पहिल्याच पर्वात सर्वांना सुखद अनुभव दिले आहेत. सुयशने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये 25.80च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत.
Published at : 12 May 2023 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)