एक्स्प्लोर
IPL 2023 : अपघातात पायांना मोठी दुखापत, चालणंही होतं अवघड, तोच ठरलाय IPLचा 'मॅच विनर'
Nicholas Pooran Accident Story : लखनौ सुपर जायंट्सच्या निकोलस पूरनने 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धचा सामन्यात धडाकेबाज खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
LSG vs RCB | Nicholas Pooran | IPL 2023
1/10

वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन सध्या आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे.
2/10

आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 19 चेंडूत 326.32 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना पुरनने 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाच्या विजयाचा हिरो ठरला. या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
3/10

आयपीएल 2023 मध्ये चमकणारा निकोलस पुरन जानेवारी 2015 मध्ये एका भीषण कार अपघाताचा बळी ठरला होता. या अपघातात पुरणचे दोन्ही पाय जवळपास निकामी झाले होते.
4/10

या भीषण अपघातावेळी त्याचं वय फक्त 19 वर्षे होतं आणि त्यावेळी तो त्याच्या क्रिकेटमधील करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता.
5/10

या दुर्घटनेत पुरनचा पेटेलर टेंडन फाटला होता उजव्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला होता.
6/10

अपघात इतका गंभीर होता की शस्त्रक्रियेपूर्वी पूरन पुन्हा क्रिकेट खेळू शकेल की नाही याबाबत डॉक्टरही साशंक होते.
7/10

अपघातानंतर पूरनने अनेक महिने व्हील चेअरवर घालवले. पण, काही काळानंतर पुरनने स्वत:ला अपघातातून सावरलं. त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केलं.
8/10

आयपीएल (IPL) 2023 मध्ये निकोलस पुरन लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळत आहे.
9/10

लखनौ संघाने आयपीएल मिनी लिलावात निकोलस पुरनला 16 कोटींच्या मोठ्या किमतीत पुरनला खरेदी केलं. चौथ्या सामन्यातच त्याने शानदार खेळी करून संघाचा विश्वास सार्थ ठरवला.
10/10

दुसरीकडे, पुरनच्या वेस्ट इंडिज संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. निकोलस पुरनने आतापर्यंतच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 54 एकदिवसीय आणि 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Published at : 13 Apr 2023 02:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
