एक्स्प्लोर
IPL 2025 Shreyas Iyer: आयपीएल सुरु असताना श्रेयस अय्यरचं नशीब फळफळलं; आयसीसीकडून मिळालं मोठं गिफ्ट
IPL 2025 Shreyas Iyer: गेल्या महिन्यात टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली.
IPL 2025 Shreyas Iyer
1/8

IPL 2025 Shreyas Iyer: सध्या भारतात सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल खेळली जात आहे. या लीगमध्ये जगातील सर्व स्टार खेळाडू खेळत आहेत.
2/8

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला एक मोठी भेट दिली आहे.
3/8

गेल्या महिन्यात टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
4/8

आता श्रेयस अय्यरला या शानदार कामगिरीबद्दल आयसीसीने बक्षीस दिले आहे.
5/8

श्रेयस अय्यरने मार्च 2025 चा आयसीसी ICC PLAYER OF THE MONTH पुरस्कार जिंकला आहे, त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र यांना मागे टाकले आहे.
6/8

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला शुभमन गिलची महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली होती.
7/8

श्रेयस अय्यरने दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. याआधी भारताकडून फक्त शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनीच दोन किंवा त्याहून अधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
8/8

मार्च महिन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी कशी होती?- श्रेयस अय्यरने मार्च महिन्यात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले आणि 57.33 च्या सरासरीने 172 धावा केल्या. या काळात, त्याने ग्रुप अ सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 79 धावा, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 45 धावा आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 48 धावा केल्या.
Published at : 15 Apr 2025 01:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























