एक्स्प्लोर
Mohammed Shami : 'कमबॅक' मिशन सुरू! मोहम्मद शमीची IPL नंतर संघात झाली निवड, कधी दिसणार मैदानात?
Mohammed Shami is set to Comeback : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा बंगालच्या आगामी देशांतर्गत हंगामासाठी 50 संभाव्य खेळाडूंच्या विस्तारित यादीत समावेश करण्यात आला आहे.
Mohammed Shami is set to Comeback
1/9

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा बंगालच्या आगामी देशांतर्गत हंगामासाठी 50 संभाव्य खेळाडूंच्या विस्तारित यादीत समावेश करण्यात आला आहे.
2/9

28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीने होईल.
3/9

शमी यामध्ये पूर्व विभागाकडून खेळू शकतो. यामुळे त्याचे क्रिकेटमध्ये पुनरागमन निश्चितच होऊ शकते.
4/9

या वर्षी मार्चमध्ये संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शमी शेवटचा भारतीय जर्सीमध्ये खेळताना दिसला होता.
5/9

आतापर्यंत 64 कसोटी, 108 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या या गोलंदाजामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव केला.
6/9

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शमीने पाच सामने खेळले आणि 9 विकेट घेतल्या. यावेळी 5.68 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.
7/9

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, मोहम्मद शमी इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादमध्ये सामील झाला.
8/9

गेल्या हंगामातील आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सनरायझर्स संघाला त्यांच्या सरासरी कामगिरीमुळे संघर्ष करावा लागला आणि ते पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर राहिले.
9/9

शमी त्याच्या नवीन फ्रँचायझीसोबत फारसा प्रभावी दिसला नाही. त्याने 9 सामन्यांमध्ये 11.23 च्या इकॉनॉमीने फक्त 6 विकेट्स घेतल्या.
Published at : 19 Jul 2025 06:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























