अफगाणिस्तानाचा ताबा तालिबाननं घेतल्यानंतर आज 20 वर्षांनी अमेरिकेचं सैन्य माघारी परतलं आहे.
2/11
अमेरिकेनं अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्याची आणि अमेरिकन नागरिकांसह अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सुरु केलेल्या लष्करी मोहिमेच्या शेवटाची घोषणा केली. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्याचे शेवटेचे काही फोटो...
3/11
अमेरिकेने अफगाणिस्तानमधील राजनैतिक उपस्थितीही संपवली आणि कतारला स्थलांतरित केली.
4/11
शेवटचं सी-17 विमान हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी रवाना झालं.
5/11
अमेरिकेनं आपल्या सैनिकांना अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघारी घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची अंतिम तारिख दिली होती. त्यापूर्वीच अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतलं आहे.
6/11
काबूल विमानतळावर अमेरिकन वायू सेनेच्या एका मोठ्या विमानात अमेरिकन सैन्याचे हेलिकॉप्टर्सही देशात रवाना करण्यात आले.
7/11
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सैन्यानं अफगाणिस्तान सोडल्यानंतर म्हणाले की, ज्या अफगाण नागरिकांना देश सोडायचा आहे, त्यांच्यासाठी कोणतीही डेडलाइन नाही.
8/11
बायडन म्हणाले की, अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना देशातून बाहेर पडायचं असेल तर अमेरिका शक्य ती मदत करेल.
9/11
तालिबाननं देशातून अमेरिकन सैन्याच्या वापसीनंतर अफगाणिस्तान पूर्णपणे स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.
10/11
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, "सर्व अमेरिकन सैन्य काबुल विमानतळावरुन रवाना झाले आहेत. आता आमचा देश पूर्णपणे स्वतंत्र आहे."
11/11
अमेरिकेची विमानं रवाना होताना पाहून तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला.