एक्स्प्लोर
Tonga Tsunami : 30 वर्षातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट; जपानला त्सुनामीचा तडाखा!
(Tonga Tsunami Photo : PTI / Laviniah Tupou/FB)
1/9

न्यूझीलंडजवळ पॅसिफिक महासागरच्या किनारपट्टीवर असलेल्या टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. टोंगामध्ये गेल्या 30 वर्षातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट आहे. (Photo : PTI)
2/9

यानंतर टोंगामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. टोंगात समुद्राखाली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानला त्सुनामीचा तडाखा बसलाय. (Photo : PTI)
3/9

यानंतर किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. (Photo : PTI)
4/9

टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. (Photo : PTI)
5/9

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचे न्यूझीलंडच्या सैन्य दलाने म्हटलंय. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज पडल्यास मदतीसाठी सज्ज आहोत असं न्यूझीलंड सैन्य दलाने सांगितलंय. (Photo : PTI)
6/9

उपग्रहातून घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये प्रशांत महासागराच्या निळ्या पाण्यावर पसरलेली राख, वाफ आणि वायू दिसत आहे. (Photo : Laviniah Tupou/FB)
7/9

टोंगा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण टोंगासाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. (Photo : Laviniah Tupou/FB)
8/9

आणि पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राच्या डेटामध्ये 80 सेमी पर्यंत उंच लाटा आढळल्या आहेत. (Photo : Laviniah Tupou/FB)
9/9

अमेरिकन रहिवाशांना त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला होता. तसेच किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. (Photo : Laviniah Tupou/FB)
Published at : 16 Jan 2022 11:59 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























