एक्स्प्लोर
PHOTO : ना कुठलं बंधन, ना कुठली सीमा! अंजली-सुफीच्या प्रेमाची जगभरात चर्चा

Anjali Chakra And Sufi Malik
1/7

प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं! हे कवीने उगीच म्हटलेलं नाही. याच ओळीचा खरा अर्थ जगाला सांगणारी एक जोडी सध्या सोशल मीडियावरून जगभरात गाजते आहे. ही जोडी आहे अंजली चक्र (Anjali Chakra) आणि सुफी मलिक (Sufi Malik) यांची...
2/7

सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेट जगतात अंजली आणि सुफीची प्रेमकथा प्रचंड चर्चेत आहे. यातील अंजली ही भारतीय हिंदू मुलगी असून, सुफी ही पाकिस्तानी मुस्लिम मुलगी आहे.
3/7

अंजली चक्र आणि सुफी मलिक यांची प्रेमकथा जगभरात गाजते आहे. हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान अशा कुठल्याच बंधनात न अडकता या मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत.
4/7

अंजली आणि सुफी ही जोडी जातीपातीचं बंधन मोडून जगाला आपल्या प्रेमाची दखल घेण्यास भाग पाडत आहे. दोघींनीही आपले एकमेकींवरचे प्रेम मोकळ्या मानाने स्वीकारले आहे.
5/7

काही काळापूर्वी बोल्ड फोटोशूट करत आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची कथा सांगणारी ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
6/7

अंजली चक्र ही मूळची भारतीय हिंदू मुलगी आहे आणि सुफी ही मूळची पाकिस्तानी मुस्लिम मुलगी आहे. अंजली चक्रने तिची आणि सुफीची प्रेमकहाणी जगासमोर मांडली आहे.
7/7

समलैंगिक संबंधांबद्दल बिनधास्त बोलणारी ही जोडी जगभरात लोकप्रियता होऊ लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघी एकमेकींना डेट करत होत्या. मात्र, आता त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. आता त्या दोघीही आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. (Photo : @Anjali Chakra/IG)
Published at : 19 Jul 2022 10:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
