आता या प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने दिले आहे.
दुबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शुभमन गिलला विचारण्यात आले की, रोहित शर्मा निवृत्त होणार आहे का, त्यावर त्याने मोठा खुलासा केला.
शुभमन गिल म्हणाला की, ड्रेसिंग रूममध्ये रोहितच्या निवृत्तीबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.
रोहित याबद्दल विचारही करत असेल असे शुभमन गिलला वाटत नाही.
शुभमन गिल पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'फायनलपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी कशी जिंकायची यावर चर्चा झाली आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल संघाशी किंवा माझ्याशी (शुभमन गिल) कोणतीही चर्चा झाली नाही.
सामना संपल्यानंतरच तो त्याचा निर्णय घेईल अस शुभमन गिल म्हणाला.