एक्स्प्लोर
Nothing Ear Stick भारतात लॉन्च, 29 तास चालणार बॅटरी; जाणून घ्या काय आहे किंमत!
नथिंग इअर (स्टिक) भारतात 8,499 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे. हे इयरबड्स 17 नोव्हेंबर 2022 पासून Myntra आणि Flipkart वरून खरेदी करता येतील.
(फोटो सौजन्य : nothing website)
1/9

नथिंगने भारतात आपले नथिंग इअर स्टिक लाँच केले आहे. हे कंपनीचे दुसरे पेअर इअरबड्स आणि नथिंग फोन नंतरचे तिसरे उत्पादन आहे. (फोटो सौजन्य : nothing website)
2/9

उत्कृष्ट डिझाईन व्यतिरिक्त, हे इयरबड्स 29 तासांपर्यंत प्लेटाइम देतात. यात 12.6 मिमीचा मोठा ड्रायव्हर आहे जो बेस्ट साऊंड क्वालिटी देतो.(फोटो सौजन्य : nothing website)
3/9

नथिंग इयर (स्टिक) भारतात 8,499 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे. हे इयरबड्स 17 नोव्हेंबर 2022 पासून Myntra आणि Flipkart वरून खरेदी करता येतील.(फोटो सौजन्य : nothing website)
4/9

इअरबड्स nothing.tech वर उपलब्ध असतील आणि यूके, यूएस आणि युरोपसह 40 देश आणि प्रदेशांमधील रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. यातल्या प्रत्येक बडचे वजन फक्त 4.4 ग्रॅम आहे.(फोटो सौजन्य : nothing website)
5/9

या इयरबड्समध्ये ACTIVE NOISE CANCELLATIONचा पर्याय उपलब्ध नाहीये. पण त्यात bass lock technology दिलेली आहे.(फोटो सौजन्य : nothing website)
6/9

नथिंग इयर (स्टिक)चा एकंदर आकार थर्ड-जेन ऍपल एअरपॉड्सची आठवण करून देणारा ठरतोय.(फोटो सौजन्य : nothing website)
7/9

नवीन इअरबड्सच्या डिझाइनवर कंपनीने खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही भारतीय बाजारपेठेत अशा प्रकारचे डिझाइन असलेले इअरबड्स क्वचितच पाहिले असतील. अतुलनीय डिझाइन व्यतिरिक्त, हे नवीनतम इयरबड जबरदस्त बॅटरी लाईफसोबत येतात.(फोटो सौजन्य : nothing website)
8/9

कंपनीचा दावा आहे की हा डिवाइस 29 तासांपर्यंत प्लेटाइम ऑफर करतो. कंपनीचे सह-संस्थापक कार्ल पेई म्हणतात की इअरबड्सच्या केसला लिपस्टिकचे स्वरूप देण्यात आले आहे. ((फोटो सौजन्य : nothing website)
9/9

नथिंग इअर (स्टिक) 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 2 तासांचा प्लेटाइम देते. वापरकर्त्यांना यात तीन हाय डेफिनिशन माइक मिळतात, जे विंड और क्राउड प्रूफ आहेत.(फोटो सौजन्य : nothing website)
Published at : 29 Oct 2022 01:47 PM (IST)
आणखी पाहा























