एक्स्प्लोर
Solapur News: सिद्धेश्वर महाराजांचा मिरवणूक मार्ग रांगोळीने सजला, रांगोळीतून समाज प्रबोधनाचाही प्रयत्न
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील विवाह सोहळा आज संपन्न होत आहे.

Solapur News
1/9

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील विवाह सोहळा आज संपन्न होत आहे.
2/9

त्यापूर्वी मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून सातही नंदीध्वजांची मिरवणूक निघाली आहे.
3/9

हिरेहब्बू वाडा ते सिद्धेश्वर मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग असतो. साधारण साडे तीन किलोमीटर अंतर या मिरवणूक मार्गाचा आहे.
4/9

या संपूर्ण मार्गावर संस्कार भारती या संघटनेतर्फे रांगोळी काढण्यात आली आहे.
5/9

साधारण 50 पोती रांगोळी आणि 1 हजार किलो रंगाचा वापर करून भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे.
6/9

यासाठी संस्कार भारतीचे सुमारे 200 कार्यकर्ते परिश्रम घेतं होते. दरवर्षी या रांगोळीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते.
7/9

यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आत्मनिर्भर भारत हा विषय घेऊन रांगोळी काढण्यात आली आहे.
8/9

विशेष म्हणजे श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालीनी फडणवीस यांनी या रांगोळीचे उद्घाटन केले.
9/9

तसेच मृणालिनी फडणवीस यांनी रांगोळी काढण्याचा आनंद घेतला. या भव्य दिव्य रांगोळीचा आढावा घेतलाय
Published at : 14 Jan 2023 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भारत
बातम्या
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
