एक्स्प्लोर
Pandharpur Rain: चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली, वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली, PHOTO
Pandharpur Rain: उजनी व वीर धरणातून सोडलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
Pandharpur Rain
1/6

पुणे व सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनी धरणाचा विसर्ग एक लाखावरून 80 हजार तर वीरधरणाचा 17000 वरून 3000 इतका कमी केल्याने पंढरपूरवरील पुराचा धोका कमी झाला आहे.
2/6

उजनी व वीर धरणातून सोडलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
3/6

यावर्षी पाचव्यांदा पंढरपूरवर पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पावसाने उसंत घेतल्याने 109% भरलेल्या उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 80 हजार पर्यंत कमी झाला आहे.
4/6

सध्या जिल्ह्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने हे पावसाचे पाणीही ओढ्या नाल्यातून चंद्रभागेला मिसळत असल्याने पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
5/6

मात्र अशाही धोकादायक स्थितीत भाविक स्नानासाठी चंद्रभागेत उतरत असून आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
6/6

उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हि आता 40 हजार पर्यंत कमी झाल्याने हळूहळू धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणीही कमी होणार आहे.
Published at : 16 Sep 2025 10:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























