एक्स्प्लोर

Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक

Putin India Visit : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की जगानं भारताचं ठाम धोरण पाहिलंय. 

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)  भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातील विविध सामंजस्य करारावर स्वाक्षरी दोन्ही देशांच्या प्रमुखांकडून केली जाऊ शकते. व्लादिमीर पुतिन यांना अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफ संदर्भात विचारण्यात आलं होतं. त्याबाबत पुतिन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दबावात येणारे नेते नाहीत, असं ते म्हणाले. अमेरिका टॅरिफच्या माध्यमातून दबाव टाकतेय, का असा प्रश्न पुतिन यांना विचारण्यात आला होता.  

व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी व्लादिमीर पुतिन यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत पुतिन यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची द्वीपक्षीय चर्चा आणि भारत- रशियाच्या संबंधांचे भविष्य  याबाबत प्रश्न विचारण्यात आले. या मुलाखतीत पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं. जगानं भारताचं ठाम धोरण पाहिलं आहे. देशाला आपल्या नेतृत्त्वावर अभिमान असला पाहिजे, असं पुतिन म्हणाले. पुतिन यांनी हे देखील सांगितलं की भारत आणि रशियातील  90 टक्क्यांहून अधिक द्वीपक्षीय व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत.  

व्लादिमीर पुतिन यांनी त्यांचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी भारताचा दौरा करत असल्यानं आनंद असल्यचं म्हटलं. पुढील बैठक भारतात आयोजित करण्यास दोन्ही नेत्यांची सहमती असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.  

भारत रशिया सहकार्य आणि ऐतिहासिक संबंध

पुतिन यांनी अनेक गोष्टींवर चर्चा होणार असल्याचं म्हटलं. भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्याची व्याप्ती मोठी आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध देखील त्यांनी अधोरेखित केलं. भारतानं स्वातंत्र्यानंतर केलेल्या प्रगतीचं पुतिन यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांच्या कमी वेळात भारतानं अद्भुत विकास केल्याचं पुतिन म्हणाले.  

व्लादिमीर पुतिन यांनी नऊ वेळा भारताचा दौरा केला आहे. त्यापैकी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तीनवेळा (2016,2018 आणि 2021) पुतिन भारतात आले. डिसेंबरमध्ये हा त्यांचा दहावा दौरा असेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातवेळा रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. 

पुतिन यांचा भारत दौरा

व्लादीमीर पुतिन आज राजधानी नवी दिल्लीत सांयकाळी साडे वाजता दाखल होतील. 23 व्या भारत रशिया वार्षिक समिटसाठी पुतिन दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात येत आहेत.  या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करतील. याशिवाय ते राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करतील. रशिया यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर व्लादीमीर पुतिन पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ते यापूर्वी डिसेंबर 2021 ला भारताच्या दौऱ्यावर आले होते.  

पुतिन यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक

4 डिसेंबर 2025

सांयकाळी 6.35 ला नवी दिल्लीत आगमन

5 डिसेंबर 2025

सकाळी 11 वाजता : राष्ट्रपती भवनात स्वागत कार्यक्रम

सकाळी 11.30 वाजता : राजघाटावर महात्मा गांधी यांना अभिवादन 

सकाळी 11.50 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हैदराबाद हाऊसला चर्चा

1.50  : प्रेस स्टेटमेंट

सायंकाळी 7 वाजता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

रात्री  9 वाजता : रशियाकडे प्रस्थान

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Mayor Reservation : ठाण्यात शिवसेनेचा महापौर होईल- म्हस्के, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Embed widget