एक्स्प्लोर
Solapur News : श्रावणाचा पहिला दिवस आणि गुरुवार... अक्कलकोट मंदिरात भाविकांची मांदियाळी
Swami Samarth Temple Akkalkot : आजपासून निज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.

Swami Samarth Temple Akkalkot
1/9

आज श्रावणाचा पहिला दिवस आणि त्यातच गुरुवात असल्याने अक्कलकोटमध्ये भक्तांची मंदियाळी पाहायला मिळत आहे. (PC:AftabShaikh/ABPMajha)
2/9

श्रावणाच्या पहिल्या दिवशी भक्तिमय वातावरण आणि आर्शिवादाने सुरुवात व्हावी, यासाठी भाविकांनी अक्कलकोट मंदिरात गर्दी केली. (PC:AftabShaikh/ABPMajha)
3/9

त्यातच गुरुवारी स्वामी समर्थ व्रताचा वार आहे. त्यामुळे या दिवशी दर्शनासाठी भाविक येथे मोठ्या संख्येने दाखल होतात. (PC:AftabShaikh/ABPMajha)
4/9

श्री स्वामी समर्थ्यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात पहाटे पासून मोठी रांग लागली आहे. (PC:AftabShaikh/ABPMajha)
5/9

स्वामी समर्थांची नगरी असलेलं अक्कलकोट येथे दररोज हजारो भाविक येतात. (PC:AftabShaikh/ABPMajha)
6/9

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या राज्यातून लाखो भाविक येत असतात. (PC:AftabShaikh/ABPMajha)
7/9

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चांगली बाब म्हणजे शासनाकडून काही महिन्यांपूर्वीच अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. (PC:AftabShaikh/ABPMajha)
8/9

अक्कलकोटसाठी जवळपास 369 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाकडून भाविकांसाठी येत्या काळात विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. (PC:AftabShaikh/ABPMajha)
9/9

1995 साली अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला. मात्र, त्यानंतर पहिल्यांदाच अक्कलकोटच्या विकासासाठी इतका भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. (PC:AftabShaikh/ABPMajha)
Published at : 17 Aug 2023 05:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
