अंधारल्या मार्गावरी कधी रुते पायी काटा, तुझ्यासंगे प्रवासात प्रकाशमान जाहल्या वाटा, धावून येशील संकटात देसी दुबळ्यांना हात, जरी आलो नाही पंढरपुरा तुझी नित्य असे साथ.. या काव्याची प्रचिती सिंधुदुर्गात येत आहे.
2/8
चित्रकार समीर चांदरकर यांनी उद्या (10 जुलै) असलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने बल्बमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे.
3/8
मातीपासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती एका छोट्याशा बल्बमध्ये उतरवून पांडुरंगाची कलाकृती साकारली आहे.
4/8
ही मूर्ती मातीपासून साकारण्यात आली आहे.
5/8
समीर चांदरकर यांनी घरीच सात ते आठ दिवसांच्या प्रयत्नांतून ही मूर्ती साकारली आहे.
6/8
थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. या शोधामुळे सर्वत्र प्रकाश उजळून निघाला. पण कित्येक वर्ष अंधारात चाचपडत असलेल्या दीन दुबळ्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा पांडुरंग आजही आपलं आयुष्य हे प्रकाशमय करत आहे.
7/8
गेली दोन वर्ष कोरोनामुळे विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले आहे. तेच भक्त आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत.
8/8
सोसाट्याचा वारा ,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत.