एक्स्प्लोर
सांगली : कडेगावमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोहरम; गगनचूंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा
मोठ्या जल्लोषात गगनचुंबी ताबूत भेटींचा हा लक्षणीय सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कनार्टक राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. गावातील हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात.
Sangli News
1/11

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यामधील कडेगावमध्ये मोहरम आज उत्साहात संपन्न झाला.
2/11

यानिमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली होती.
3/11

गावातील हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात. आज मोहरम दिवशी हा सोहळा दरवर्षीप्रमाणे उत्साहात संपन्न झाला.
4/11

कडेगाव शहरातील जुने एसटी स्टँड चौकात ताबूत भेटी पार पडल्या.
5/11

मोठ्या जल्लोषात गगनचुंबी ताबूत भेटींचा हा लक्षणीय सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कनार्टक राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
6/11

सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. याठिकाणी पार पाडणारा मोहरम सण हा प्रतीक आहे.
7/11

गेली दीडशे वर्षांपासून कडेगावमध्ये गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे गावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन हा सण साजरा करतात.
8/11

. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे ते दोनशे फुट असणारे गगनचुंबी ताबूत अर्थात डोले.
9/11

. हे ताबूत बांधण्याचे काम सर्व समाजातील लोकांच्या माध्यमातून करण्याची प्रथा आहे.
10/11

मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद नंतर या ताबूत बांधणीच्या कामाला सुरवात होते.
11/11

. विशेष म्हणजे या दीडशे फुटी उंच बांधण्यात येणाऱ्या ताबूता मध्ये कोठेही गाठ मारण्यात येत नाही.
Published at : 29 Jul 2023 02:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























