एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2025 : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या "चोर' गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना...चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापनेची 150 वर्षांची परंपरा
Ganesh Chaturthi 2025 : पंचायतन संस्थानच्या गणेशाची चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते. सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या चोर गणपतीला 150 वर्षांची परंपरा आहे.
Ganesh Chaturthi 2025
1/9

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या 'चोर' गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली.
2/9

चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा सांगलीचा गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहेत.
3/9

गणेशोत्सवानिमित्त गणपती मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.
4/9

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या चोर गणपतीला 150 वर्षांची परंपरा आहे.
5/9

पंचायतन संस्थानच्या गणेशाची चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते.
6/9

चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भक्त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला "चोर गणपती' म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.
7/9

गणेश चतुर्थीच्या आधी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते.
8/9

दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते.
9/9

गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसविण्यात येतात. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात.
Published at : 24 Aug 2025 08:42 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
भारत
























