एक्स्प्लोर
PHOTO : लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा
लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्या याबाबत कायदा बनवण्याच्या मागणीसाठी आज सांगलीत सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
Sangli Hindu Garjana Morcha
1/9

लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्या याबाबत कायदा बनवण्याच्या मागणीसाठी आज सांगलीत सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
2/9

या मोर्चासाठी सकाळी दहा वाजता राम मंदिर चौक सांगली मिरज रोड या ठिकाणी समस्त सकल हिंदू समाज एकत्र आला.
3/9

या मोर्चामध्ये सकल हिंदू माता-भगिनींसाठी गोमातेसाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले होतं.
4/9

याचबरोबर हिंदू गर्जना मोर्चामध्ये मोठ्या संख्येने तरुणी आणि महिलांनी हजेरी लावली.
5/9

हिंदू समाज आणि संस्कृतीचा सर्वनाश करु पाहणाऱ्या अशा सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा बनवून राष्ट्र आणि धर्माचे रक्षण करावं अशी मागणी समस्त हिंदू समाज या मोर्चाद्वारे करत आहेत.
6/9

या मोर्चासाठी राम मंदिर सांगली मिरज रोड परिसरामध्ये सर्व तयारी करण्यात आली.
7/9

राम मंदिर चौकामध्ये भव्य असा व्यासपीठ उभारण्यात आला आहे.
8/9

या व्यासपीठावर सकल हिंदू समाजाच्या नेत्यांची भाषणे होणार आहेत.
9/9

याच व्यासपीठावरुन लव जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्या याचा नायनाट करणारा कायदा बनवण्याचा ठराव केला जाणार आहे.
Published at : 24 Dec 2022 12:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























