एक्स्प्लोर
Alphonso Mango : हापूस आंब्यासमोर संकटांची मालिका; उष्माघातामुळे फळगळ
Alphonso Mango : उशिराने आलेला मोहर, मग थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे फळगळ, यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

Alphonso Mango
1/9

कोकणचा हापूस आंबा जगात प्रसिद्ध. अगदी इंग्लंडच्या राणीने देखील हापूसची चव चाखल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली.
2/9

पण याच हापूस समोर सध्या संकटांची मालिका उभी आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
3/9

उशिराने आलेला मोहर, मग थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे फळगळ, यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
4/9

लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरु झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला.
5/9

मोहरला. त्यानंतर देखील या मोहरावर थ्रिप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली.
6/9

अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात का असेना हापूस हाताशी लागेल अशी आशा इथल्या शेतकऱ्यांना होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे.
7/9

कारण सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास 75 टक्के हापूस हा गळून पडत आहे.
8/9

परिणामी कोकणातला शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. अशा या परिस्थितीमध्ये तो मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता देखील आहे.
9/9

त्यामुळे आता या वातावरण बदलाचा अभ्यास अभ्यासकांनी करावा आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी मागणी हा शेतकरी करत आहेत.
Published at : 27 Mar 2023 03:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बीड
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion