एक्स्प्लोर
Shivrajyabhishek 2024 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह! महाराजांना वंदन करण्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी
Shivrajyabhishek 2024 : यंदा शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
Shivrajyabhishek 2024
1/8

संपूर्ण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवरायांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय
2/8

महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वदन करण्यासाठी रायगडावर जमा झाले आहेत.
3/8

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. त्यामुळे रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
4/8

छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय.
5/8

या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ढोलताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे.
6/8

अनेक शाहीर कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. एकूणच किल्ले रायगडावर वातावरण अगदी शिवमय झालं आहे.
7/8

या सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकूण 39 समित्या गडावर तयारीसाठी दाखल झाल्या आहेत.
8/8

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येत असतात. त्यानिमित्ताने पोलीस प्रशाननाकडूनही संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय.
Published at : 06 Jun 2024 09:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























