एक्स्प्लोर
Pune News : शुभमंगल सावधान! श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा पारंपरीक पद्धतीने थाटात साजरा
श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा पारंपरीक पद्धतीने थाटात साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजन करण्यात आलं होतं.
shrimant dagadusheth ganpati
1/8

शुभमंगल सावधानचे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला... राधे कृष्ण, गोपाल कृष्णचा वऱ्हाडी मंडळींनी केलेला अखंड जयघोष आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुळशी वृदांवन घेऊन काढलेली वरात… अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा मंडईतील साखरे महाराज मठात पार पडला.
2/8

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
Published at : 24 Nov 2023 11:54 AM (IST)
आणखी पाहा























