एक्स्प्लोर
Photos: कुठं साचलं पाणी, कुठं झाडं पडली, पुण्यात वाहतूक कोंडी; पावसामुळे जनजीवन विस्कळीत
पुणे शहरात आज विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी पूरस्थिती दिसून आली. येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून पुणेकरांना मार्ग काढवा लागला.
Pune rain photos
1/9

पुणे शहरात आज विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे संबंधित परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी पूरस्थिती दिसून आली. येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून पुणेकरांना मार्ग काढवा लागला.
2/9

अनेक भागात काहींनी पावसाच्या पाण्यात उड्या मारुन पहिल्या पावसाचा आनंद घेतला. मात्र, आजचा पुण्यातील पाऊस ढगफुटीसदृश्य असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
3/9

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणेकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तसेच, पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विट करुन पाणी ओसरेपर्यंत पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
4/9

पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
5/9

कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे, त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. तरी प्रशासनाच्या वतीनं तातडीनं उपाययोजना करण्याच्या तसंच पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
6/9

पुण्यातील शिवाजीनगर: 103 मिमी, सदाशिव पेठ : 93 मिमी, कोथरूड : 91 मिमी सिंहगड रस्ता : 74 मिमी, पाषाण: 65 मिमी, बावधन: 48 मिमी, बिबवेवाडी: 56 मिमी खराडी: 31 मिमी, एनडीए: 41 मिमी, वाघोली : 44मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे.
7/9

पुणे शहरातील 32 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. येरवडा, नागपुर चाळ, कोथरुड बस स्टैंड सिहंगड रोड, दामोदर नगर, शिवाजीनगर, सावरकर भवन, सहकार नगर, तावरे कॉलनी सेनापती बापट रोड, गणेश खिंड रोड, ई स्क्वेअर,कोंढवा खुर्द, भैरवनाथ मंदिर, मार्केटयार्ड, संदेश नगर, कल्याणीनगर, गुरूनानक डेअरी, येरवडा, सैनिक नगर, नवी पेठ
8/9

सुखसागर नगर, आई माता मंदिर, पर्वती दर्शन, शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी, विमाननगर रास्ता पेठ, दारुवाला पुल, एरंडवणा, महादेव मंदिर, पद्मावती, ट्रेझर पार्क खडकी, रेंजहिल चौक, भवानी पेठ, रामोशी गेट, एरंडवणा, खिलारेवाडी जंगली महाराज रोड, वाकडेवाडी, पीएमसी कॉलनी, कोथरुड, करिश्मा सोसायटी, कोथरुड, मयुर कॉलनी, येरवडा क्षेञिय कार्यालय, विमानतळाजवळ, लोहगाव, पवार वस्ती, धानोरी, गोखलेनगर येथे झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.
9/9

पाषाण, बी यु भंडारी शोरूम जवळ सिहंगड रोड दोन ठिकाणी सेंट्रल मॉल समोर नारायण पेठ,अष्ठभुजा मंदिर जवळ खडकी, गुरुव्दाराजवळ, एरंडवणा, गणेशनगर राजेन्द्र नगर, कसबा पेठ, कुभांर वाडा या भागात सर्वाधिक पाऊस झाला.
Published at : 08 Jun 2024 09:18 PM (IST)
आणखी पाहा























