Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
Success Story : सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) शहरातील दोन मुलींनी एकाच वेळी CA च्या परीक्षेत यश मिळवलंय. अंकिता भांगे आणि दिप्ती कदम अशी CA च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलींची नावे आहेत.
Success Story Madha : चार्टर्ड अकाउंटंटच्या (CA) परीक्षेत यश मिळवणं वाटतं तितकं सोपे नाही. त्यासाठी योग्य नियोजन करुन अभ्यास करावा लागतो. अनेकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षांचाही कालावधी लागतो. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) शहरातील दोन मुलींनी एकाच वेळी CA च्या परीक्षेत बाजी मारली आहे. अंकिता आनंद भांगे आणि दिप्ती विकास कदम अशी CA च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलींची नावे आहेत. 12 वी झाल्यानंत या दोन्ही मुलींनी CA ची तयारी सुरु केली होती. आज या दोन्ही मुलींनी यश मिळवल्यानं माढा परिसरात त्यांचं कौतुक होत आहे.
विकास कदम यांची कन्या दिप्ती कदन ही शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिप्तीने हे यश मिळवलं आहे. तिचं 12 वी पर्यंतचं शिक्षण हे माढ्याच झालं होतं. 10 वी पर्यंतचं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आहे. तर 11 वी आणि 12 वीचे शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात झालं आहे. त्यानंतर दिप्ती कदन ही ने पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत बी कॉमचे शिक्षण घेतले. या काळातच तिन सीएच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती.
दिवसातील 13 ते 14 तास अभ्यास करुन दिप्ती कदमने मिळवलं यश
दरम्यान, दीप्ती कदनम हिच्याशी एबीपी माझाने संपर्क केला. यावेळी तिने यशाचे सर्व श्रेय हे आई वडील, शिक्षक तसेच मित्र मैत्रिणींना दिले. मी दिवसातील 13 ते 14 तास अभ्यास करत होते. फक्त झोपण्यासाठीच रुमवर जात होते. बाकी सर्व वेळ लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत होते अशी माहिती दिप्ती कदम ही ने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. पण हार्ड वर्क करण्याची तयारी असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता असे दिप्तीने सांगितले. पुढचे एक दोन वर्ष मी खासगी क्षेत्रात नोकरी करणार आहे. त्यानंतर मी स्वत: चं ऑफिस सुरु करणार असल्याची माहिती दिप्ती कदमने दिली.
दिप्ती कदम हिच्याबरोबरच माढ्यातील व्यावसायिक आनंद भांगे व माढा नगरपंचायतीच्या गटनेत्या संजिवनी भांगे यांची कन्या अंकिता भांगे हीने देखील सीएच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. अंकिताचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलमध्ये झाले होते. तर अकरावी व बारावीचे वाणिज्य शाखेचे शाखेतील शिक्षण सोलापूर येथील हिराचंद नेमचंद महाविद्यालयात झाले. सोलापूर येथील भारती विद्यापीठातून तिने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली होती. त्यानंतर तिने ऑनलाईन पद्धतीनेच सीएच्या परीक्षेची तयारी केली होती.
ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत अंकिता भांगेंनी घातली यशाला गवसणी
एबीपी माझाने CA ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंकिता भांगेशी देखील संपर्क साधला. यावेळी तिने सांगतिले की, माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सोलापुरात झालं आहे. कुटुंबात शैक्षणिक पार्श्वभूमी होती. 11 वी पासूनच मी या परीक्षेची तयारी सुरु केली होती. पाच वर्षात ही परीक्षा यशस्वी झाल्याची माहिती अंकिताने दिली. बुद्धी सगळ्यांना समान असते. तुम्ही मेहनत किती घेता यावर सगळं अवलंबून असते अशी माहिती अंकिताने दिली. मी दिवसातील 13 ते 14 तास अभ्यास करत होते. सोलापुरात राहूनच मी CA ची तयारी केल्याची माहिती अंकिताने एबीपी माझाला दिली. ऑनलाईन क्लाक करुनच मी हे यश मिळवलं आहे. पुढच्या काळात आणखी नॉलेज घेण्याची गरज आहे. दोन ते तीन वर्ष मी खासगी क्षेत्रात नोकरी करणार आहे. त्यानंतर मी स्वत: व्यवसाय करणार असल्याची माहिती अंकिताने दिली. माझ्या यशाचं सगळं आई-वडिलांना आहे. त्यांनी मला सगळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे अंकिताने सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
Kolhapur News : ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याचा मुलगा सीए झाला; जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणत आई बापाच्या कष्टाचा पांग फेडला!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI