Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
Ind vs Aus 4th Test day-3 : तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून 244 धावा केल्या आहे.

India vs Australia 4th Test Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथील एमसीजी येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने आपली पकड मजबूत केली आहे. आतापर्यंत यजमान संघाने भारताला एकही संधी दिली नाही आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही हाच दिसून आले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाला दोन मोठे यश मिळाले.
Lunch on Day 3 of the 4th Test.
— BCCI (@BCCI) December 28, 2024
India get 80 runs with a loss of two wickets in the morning session.
Scorecard - https://t.co/MAHyB0FTsR… #AUSvIND pic.twitter.com/CI81yXLaK4
तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून 244 धावा केल्या आहे. सध्या नितीश रेड्डी 40 धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर पाच धावांवर नाबाद आहे. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला अजूनही 31 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही 230 धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताने 27 षटकांत 80 धावा केल्या आणि दोन गडी गमावले. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या रूपाने भारताला आज दोन धक्के बसले.
ऋषभ पंत खराब शॉट खेळून आऊट
भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला 164 वरून सुरुवात केली, ऋषभ पंत-रवींद्र जडेजा या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या दोघांनी अर्ध्या तासाहून अधिक काळ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना केला आणि ते भारताच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा करतील असे वाटत होते. मात्र, त्यानंतर असे काही घडले ज्यामुळे सर्व भारतीय समर्थक संतप्त झाले. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या ऋषभ पंत मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली आणि त्यामुळे भारताला 56व्या षटकात 191 धावांवर सहावा धक्का बसला. पंतने 37 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी केली.
नितीश रेड्डी करणार पलटवार?
पंत बाद झाल्यानंतर नितीश रेड्डी जडेजाला साथ देण्यासाठी आला आणि त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत काही चांगले फटके खेळले. मात्र जडेजा फार काळ टिकू शकला नाही आणि त्याला नॅथन लायनने त्याचा बळी बनवले. अशाप्रकारे तो 51 चेंडूत 17 धावा करून सातवा विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, नितीश 40 धावा करून नाबाद आहे. त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदर उपस्थित आहे. या कसोटीत नक्कीच ऑस्ट्रेलिया ड्रायव्हिंग सीटवर आहे. पण अजून अडीच दिवसाचा खेळ बाकी आहे, त्यात टीम इंडिया बाजी मारू शकते.
हे ही वाचा -
Rohit Sharma Retirement : रोहित शर्माची उचलबांगडी की निवृत्ती घेणार? BCCIने दिली मोठी अपडेट





















