एक्स्प्लोर
Photo : जागतिक मराठी संमेलनात राज ठाकरेंचं सडेतोड भाष्य
पुण्यातील पिपंरी चिंचवडमध्ये 18 वे जागतिक मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. यामध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली.
MNS Chief Raj Thackeray
1/10

आजची राजकीय स्थिती लयाला गेली आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे. त्यामध्ये महापुरुषांना खेचलं जात आहे. हल्ली कोणीही काहीही बोलत आहे.
2/10

महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही असेही राज ठाकरे म्हणाले. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) शोभत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
3/10

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे समान बघितले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं योग्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
4/10

एखाद्या भूमिकेला राजकारणात विरोध करणे चुकीचे नाही. चांगले काम केले तर त्यांचे कौतुक केले पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले. सरकारच्या चांगल्या गोष्टीचे अभिनंदन मी केले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
5/10

मी सरळ विचार करतो. जे चांगलं आहे त्याला चांगलच म्हणणाार. जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
6/10

महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवल तरी महाराष्ट्र पुढे आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही.
7/10

पुण्यातील पिपंरी चिंचवडमध्ये 18 वे जागतिक मराठी संमेलन (Jagtik Marathi Sammelan) भरवण्यात आले आहे. यामध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी सडेसोड उत्तर दिली.
8/10

राजकारणात पैसे हे माध्यम आहे. पण मन जिंकायला लागतात तेव्हाच राजकारण होतं असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं.
9/10

राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात, विविध अंगांनी कामं करता येतात. जोपर्यंत तुमच्या सामाजिक कामांना राजकीय धार येत नाही, तोपर्यंत सामाजिक काम पुढे जाणार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
10/10

प्रत्येक मूलभूत गरजांशी राजकारण जोडलेलं आहे. मग तुम्ही राजकारणाला तुच्छ का मानता? तुम्ही पुढं येणार असाल तर मी सोबत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
Published at : 08 Jan 2023 01:28 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग




















